Marathi News> मुंबई
Advertisement

आजपासून मध्य रेल्वेकडून 72 तासांचा मेगाब्लॉक

हार्बर मार्गावर नव्याने नेरुळ उरण मार्ग सुरू होणार आहे. या मार्गाला नेरुळ आणि बेलापूरहून जोडण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून 72 तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

आजपासून मध्य रेल्वेकडून 72 तासांचा मेगाब्लॉक

मुंबई : हार्बर मार्गावर नव्याने नेरुळ उरण मार्ग सुरू होणार आहे. या मार्गाला नेरुळ आणि बेलापूरहून जोडण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून 72 तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

25 तारखेपर्यंत मेगाब्लॉक

आज मध्यरात्रीपासून 25 तारखेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या 3 दिवसांत सीएसटी ते नेरुळ मार्गापर्यंतच रेल्वे सुरू असणार आहे. मात्र बेलापूर ते पनवेल रेल्वे सेवा पूर्णपणे 3 दिवस बंद असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे प्रवाश्यांना  त्रास होऊ नये यासाठी नवी मुंबई परिवहन सेवा विशेष 30 बस सोडणार आहे. ज्या नेरुळ ते बेलापूर, खारघर आणि पनवेल दरम्यान धावणार आहेत.

Read More