Marathi News> मुंबई
Advertisement

दिवसभरात राज्यात ६६०३ नवे कोरोना रुग्ण; १९८ जणांचा मृत्यू

राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2,23,724 इतकी झाली आहे. 

दिवसभरात राज्यात ६६०३ नवे कोरोना रुग्ण; १९८ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात आज बुधवारी एका दिवसांत 6603 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2,23,724 इतकी झाली आहे. 

आज दिवसभरात 198 कोरोना रुग्णांना मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण 9448 जण दगावले आहेत. राज्यातील मृत्यूदर 4.22 टक्के इतका आहे. 

राज्यात कोरोना रुग्ण संख्या सतत वाढतेच आहे. मात्र कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत असल्याची दिलासादायक बाब समोर येत आहे. बुधवारी राज्यात 4634 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 1,23,192 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 55.6 टक्के इतका आहे.

सध्या राज्यात 91,065 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यात 6,38,762 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये, तर 47,072 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

देशात, मुंबईत सर्वाधिक 87856 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 59238 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून 5064 जणांचा बळी गेला आहे. सध्या मुंबईत 23543 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

दरम्यान, धारावीत सतत वाढणारी कोरोना रुग्ण संख्या काहीशी नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे. धारावीत आज कोरोनाचे केवळ 3 कोरोना रुग्ण वाढले आहेत. मंगळवारी एक रुग्ण आढळला होता. धारावीतील एकूण रुग्णसंख्या 2338 इतकी आहे.

 

Read More