Marathi News> मुंबई
Advertisement

'370 हा भावनिक नाही, राष्ट्रीय मुद्दा' - सीएम देवेंद्र फडणवीस

झी 24 तासला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली, या मुलाखतीत प्रत्येक प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे 

'370 हा भावनिक नाही, राष्ट्रीय मुद्दा' - सीएम देवेंद्र फडणवीस

मुंबई : झी 24 तासला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली, या मुलाखतीत प्रत्येक प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे उत्तर दिली. 370 च्या मुद्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, '370 हा भावनिक नाही राष्ट्रीय मुद्दा आहे. महाराष्ट्र का भारताबाहेर आहे, महाराष्ट्राचा काश्मीरशी काही संबंध नाही? 1989 साली काश्मीरमध्ये विद्यार्थी परिषदेने आंदोलन केलं होतं. कारण काश्मीरच्या लालचौकात अतिरेकी झेंडा लावू देत नव्हते, तेव्हा झेंडा लावायला अनेक विद्यार्थी गेले होते, त्यापैकी मी देखील एक होतो'.

यावर आणखी पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, 'माझा संबंध होता ना काश्मीरशी, त्यामुळे मी गेलो होतो, माझ्या मनाला वाटत होतं ना, माझ्या देशाचं काश्मीर आहे, म्हणून गेलो होतो, माझ्या देशाचा भाग आहे ना काश्मीर आहे, म्हणून मी गेलो होतो. काश्मीरच्या प्रश्नांचं ज्यांनी भिजत घोंगड ठेवलं, जे टेंपररी आहे, असं म्हटलं आहे, ते परत घेत असताना, काँग्रेसपार्टी विरोध करत असेल, तर त्यावर आम्ही का बोलू नये.'

भाषणातही आपण 370 चा मुद्दा का घेतो, यावर बोलताना, मुख्यमंत्री म्हणाले, 'मी माझ्या 30 मिनिटांच्या भाषणात पहिल्या 26 मिनिटात मी विकासावर बोलतो, आणि शेवटच्या 4 मिनिटात मी 370 वर बोलतो, आम्ही का बोलायचं नाही आम्ही बोलू, आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीला उघडू पाडू'.

Read More