Marathi News> मुंबई
Advertisement

१९९३ च्या स्फोटाला २५ वर्ष पूर्ण, बचावले म्हणून २५ वा वाढदिवस

1993 च्या बॉम्बस्फोटात बचावलेल्या अजमेरा यांनी रविवारी आपला वाढदिवस साजरा केला.

१९९३ च्या स्फोटाला २५ वर्ष पूर्ण, बचावले म्हणून २५ वा वाढदिवस

मुंबई : 1993 च्या बॉम्बस्फोटात बचावलेल्या अजमेरा यांनी रविवारी आपला वाढदिवस साजरा केला, १२ मार्च १९९३ रोजी या स्फोटाला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्याला पुनर्जन्म मिळाला असं समजून अजमेरा यांनी आपला २५ वा वाढदिवस साजरा केला.

अजमेरा यांच्यावर तब्बल ४० शस्त्रक्रिया

अजमेरा हे मुंबईत बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवळ झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झाले होते, त्यांच्यावर तब्बल ४० शस्त्रक्रिया करण्यात आल्या, अजमेरा यांनी आपल्याला सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याची खंत बोलून दाखवली. अजमेरा यांच्या या अनोख्या वाढदिवसाला मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते.

Read More