Marathi News> मुंबई
Advertisement

Mumbai Local News : मुंबई लोकलबाबत महत्त्वाची बातमी, या मार्गावर आणखी 12 लोकल

 Mumbai Local : मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल प्रवाशांना खूशखबर आहे. पश्चिम रेल्वेवर आणखी 12 लोकल धावरणार आहेत.

Mumbai Local News : मुंबई लोकलबाबत महत्त्वाची बातमी, या मार्गावर आणखी 12 लोकल

Mumbai Local Train Services : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. (Mumbai Local) लोकलचा प्रवास अधिक सुकर करण्यासाठी आणखी 12 लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Mumbai Local News ) त्यामुळे गर्दीपासून प्रवाशांची सुटका होणार आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने उद्या म्हणजे गुरुवारपासून 15 डब्यांच्या आणखी 12 लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 15 डब्यांच्या लोकलची संख्या 144 होणार आहे. (Mumbai News in Marathi)

25 टक्क्यांनी प्रवाशी वाहतूक क्षमता वाढणार

पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज 1387 उपनगरीय लोकल सेवा चालवल्या जात आहेत. या वाढीव डब्यांमुळे 12 डब्यांच्या लोकलच्या तुलनेत 25 टक्क्यांनी प्रवाशी वाहतूक क्षमता वाढणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सर्वाधिक 12 डब्यांच्या लोकल असून 132 पंधरा डब्यांच्या तर 79 एसी लोकल आहेत. तरीही लोकलमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्याची दखल घेत पश्चिम रेल्वेने 12 डब्यांच्या 12 लोकल पंधरा डब्यांच्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गर्दीतून मोठा दिसाला मिळणार आहे.

धिम्या आणि जलद मार्गावर इतक्या गाड्या

पश्चिम रेल्वेवर उद्यापासून चालवण्यात येणाऱ्या 15 डब्यांच्या 12 गाड्यांपैकी सहा गाड्या या धिम्या मार्गावर, तर सहा जलद मार्गावर धावणार आहेत. या गाड्या दादर, बोरिवली, अंधेरी येथून वसई, विरार, नालासोपारासाठी सुटणार आहेत. त्यामुळे गर्दी होणाऱ्या स्टेशनमधून प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा मिळणार आहे.

मुंबई मॅरेथॉनसाठी विशेष लोकल

मुंबई मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे 15 जानेवारी रोजी विरार-चर्चगेट आणि वांद्रे-चर्चगेट अशा दोन विशेष लोकल चालवणार आहे. पहाटे 3 वाजून 50 मिनिटांनी बोरिवलीहून चर्चगेटसाठी सुटणारी लोकल 3 वाजून 45 मिनिटांनी सोडली जाईल.

मेट्रोची ट्रायल रन सुरु

मुंबई मेट्रो 2अ आणि 7 मार्गावरील दहिसर ते वर्सोवा, दहिसर ते अंधेरी या लाईनवर ट्रायल रन सुरु करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 तारखेला मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर याचे उद्घाटन करण्यात येणार आहेत. मीठ चौकी ते डहाणूकरवाडी दरम्यान ही मेट्रोची ट्रायल रन सुरु आहे.

Read More