Marathi News> मराठवाडा
Advertisement

पैशासाठी लोकांच्या जीवाशी खेळ; रेमडेसिवीरमध्ये सलाईनचे पाणी टाकून विक्री

पेशाने कंपाऊंडर असलेल्या आरोपीने कोरोनाच्या संकटकाळात असं कृत्य करणं माणुसकीला काळीमा फासण्यासारखं आहे.

पैशासाठी लोकांच्या जीवाशी खेळ; रेमडेसिवीरमध्ये सलाईनचे पाणी टाकून विक्री

बीड :  बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा सर्रास काळाबाजार सुरू असल्याचे समोर आले आहे. एकीकडे कोरोनाचं थैमान थांबन्याचं नाव घेत नसताना दुसरीकडे औषधांमध्येही भेसळ करण्याचे संतापजनक प्रकार समोर येत आहेत. 

बीडमध्ये मागील आठवड्यात शिवाजीनगर पोलिसांनी तीन आरोपींना रंगेहात रेमडीसिवीर विकताना पकडल होतं. आता यामध्ये एक धक्कादायक बाब समोर आलीय, ती म्हणजे रेमडेसिवीरच्या बॉटल्समध्ये सलाईनचे पाणी टाकून विकले गेले आहे. हा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. परिणामी या इंजेक्शनचा सर्रास काळाबाजार सुरु असल्याचं समोर आलं. असं असताना तुम्ही घेतलेलं इंजेक्शन हे ओरिजनल आहे का ? हे नक्की तपासून पहा, कारण बीडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनच्या नावाखाली एका व्यक्तीला बनावट इंजेक्शन देण्यात आलं. याच दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी दोघा जणांना रंगेहात पकडलं, या प्रकरणात अधिक तपासाअंती धक्कादायक बाब समोर आली. 

घटनेतील आरोपी कंपाउंडर असून त्याने रुग्णालयातील इंजेक्शनच्या बाटल्यात सलाईनचे पाणी टाकून हे इंजेक्शन 22 हजारांना विकण्याचा प्रयत्न केला.

Read More