Marathi News> मराठवाडा
Advertisement

इस्रोचा शास्त्रज्ञ लग्नासाठी गावी आला, पण अंगाला हळद लागण्याआधीच घडली भयानक घटना...

हळदीच्या कार्यकर्मासाठी निघालेल्या नवरदेवासह अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे नवरदेव थेट रुग्णालयात दाखल झाला आहे. 

इस्रोचा शास्त्रज्ञ लग्नासाठी गावी आला, पण अंगाला हळद लागण्याआधीच घडली भयानक घटना...

Parbhani Crime News : लग्नसोहळा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो. मात्र, लग्न सोहळ्याआधी हळदीच्या कार्यकर्मासाठी निघालेल्या नवरदेवासह अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे नवरदेव थेट रुग्णालयात दाखल झाला आहे.  परभणीत हा प्रकार घडला आहे. यामुळे लग्न सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. विशेष म्हणजे नवरदेव हा  इस्रोचा शास्त्रज्ञ आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?

पंकज प्रकाश कदम असे  नवरदेवाचे नाव आहे. पंकज श्रीहरी कोटा येथे इस्रोमध्ये शास्त्रज्ञ आहे. पंकज हा यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील मुळावा येथील रहिवासी आहेत.  परभणीतच त्याचा लग्न सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. पंकज स्वतःच्या हळदी समारंभासाठी कुटुंबियांसोबत परभणी येथे निघाला होता. 

परभणी वसमत रोडवर राहटी नदी पुलावर नवरदेवाच्या कारवर हल्ला झाला.  तीन बाईक पंकज याच्या कार समोर आडव्या आल्या. बाईकवर स्वार असलेल्या सहा अज्ञात इसमांनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात वैज्ञानिक पंकज प्रकाश कदम गंभीर जखमी झाले आहेत. 

परभणीतील एका खाजगी रुग्णालयात पंकज यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंकज यांचा मंगळवारी परभणी येथे विवाह आयोजित सोहळा आयोजीत करण्यात आला होता.  लग्नसमारंभाआधी हळदी समारंभासाठी निघालेल्या पंकजवर अज्ञात इसमांनी हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. पंकज जखमी झाल्याने रुग्णायलात दाखल आहे. यामुळे विवाहसोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. 

हल्लेखोर कोण आहेत? त्यांनी पंकजवर हल्ला का केला? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिलांनी सहा अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. 

विहिरीत मृतदेह सापडल्याने खळबळ 

नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील स्वराज्य नगर या भागात एका उघड्यावर असलेल्या विहिरीत तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संतोष नारायण कांबळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. संतोष कांबळे हा एका इमारतीत वॉचमन म्हणून काम करत होता. त्याच बरोबर तो सेंट्रींगचे काम करत होता. 7 एप्रिलपासून तो बेपत्ता होता. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याचा भाऊ बाळू कांबळे याने सर्वत्र शोध घेतला. पण तो कुठेच सापडला नाही. ज्या इमारत मध्ये तो राहत होता त्या इमारतीच्या पाठीमागील इमारतीच्या समोर राहत असलेल्या कविता मौले या पाण्याची मोटर सुरू करण्याकरिता विहिरीजवळ गेले. असता त्यांना विहिरीत पाण्यात तरगतांना मृतदेह दिसला याबाबतची माहिती त्यांनी मयताचा भाऊ बाळू कांबळे याला दिली. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.  ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत. 

 

Read More