Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

आई घरी आली पण मुलगा कायमाचा गेला; नाशिक मध्ये घडली मन हेलावून टाकणारी घटना

नाशिक येथे अपघात घडला आहे. रुग्णालयातुन आईला डीचार्ज घेण्यासाठी येणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला आहे.

आई घरी आली पण मुलगा कायमाचा गेला; नाशिक मध्ये घडली मन हेलावून टाकणारी घटना

Nashik News:  नाशिक मध्ये घडली मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.  जिल्हा शासकीय रुग्णालयातुन आईला डीचार्ज घेण्यासाठी येणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला आहे. मुलाच्या निधनाचे वृत्त समजताच आईला मोठा धक्का बसला.  या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.   

नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातुन आईला डीचार्ज घेण्यासाठी येणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला आहे. नाशिकच्या द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊस येथील उड्डाणपुलावर हा अपघात झाला.  आकाश कैलास कोतकर असे मृत तरुणाचे नाव आहे. 

आकाश याच्या आईवर गेल्या चार दिवसांपासून शासकीय जिल्हा रुग्णालय उपचार सुरु होते. शनिवारी त्याच्या आईला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता. आईला घरी घेऊन जाण्यासाठी आकाश पिंपळगाव येथून नाशिकला त्याच्या मित्रांसोबत दुचाकीवर निघाला होता. 

द्वारका येथील उड्डाणपुलावर आकाशचा अपघात आला. याठिकाणी बंद कंटेनर उभा होता. आकाश याची दुचाकी उभ्या असलेल्या  कंटेनरला माग च्या बाजूस जाऊन आदळली. यात दोघंही गंभीर जखमी झाले होते. दोघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी आकाश याला मृत घोषित केल असून एक गंभीर जखमी आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत

समृद्धी महामार्गावर अपघात

वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे कारवरील नियंत्रण सुटल्याने समृद्धी महामार्गावरील अपघात झाला आहे. संभाजी नगर कडून नागपूर कडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा अपघात झाला.  पावसामुळे  वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाशिमच्या जऊळका परिसरात हा अपघात झाला आहे.  अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये कार चार ते पाच पलट्या खात रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर वाशिम येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर टेंम्पो पलटला 

मुंबईहून ठाणे शहराच्या दिशेने येत असताना तीन हात नाका उड्डाणपुलावर दुभाजकाच्या मधोमध एक टेम्पो पलटी होऊन अपघात झाला होता. यात टेम्पोचाल किरकोळ जखमी झाला असून टेम्पो मधोमध पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, वाहतूक पोलिसांनी काही वेळातच टेम्पो बाजूला केल्याने वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली.

 

Read More