Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कळव्यात तरूणावर गोळी झाडणारा आरोपी जेरबंद

कळव्यातील मेडिकलमध्ये प्रेमसिंग राजपुरोहित या तरुणाची गोळी झाडून हत्या करणाऱ्या आरोपीला 

कळव्यात तरूणावर गोळी झाडणारा आरोपी जेरबंद

नाशिक : कळव्यातील मेडिकलमध्ये प्रेमसिंग राजपुरोहित या तरुणाची गोळी झाडून हत्या करणाऱ्या आरोपीला नाशिक शहर पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने नाशिकमधून अटक केली आहे. वीस दिवसानंतर या हत्याकांडाची उकल झाली. सर्फराज हरून अन्सारी (२६) असे या आरोपीचे नाव असून मूळचा झारखंडचा आहे. या गुन्ह्यात मुख्य आरोपीसह आणखीन दोन महिलांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय होता. 

पोलिसांनी विविध रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तरीही आरोपींचा थांगपत्ता लागलेला नव्हता. दरम्यान, संशयीत आरोपींची छयाचित्रे ठाणे गुन्हे शाखेकडून नाशिक पोलिसांना मिळाली होती. 

त्यानुसार नाशिकच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास करत सीसीटीव्ही फुटेजमधील महिला आणि मुलीचा शोध घेतल्यानंतर दोघीही नाशिकमध्येच सापडल्या. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत सर्फराजविषयी माहिती पोलिसांना समजली. 

निलगिरी बाग परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गुरुवारी सकाळी सर्फराजला ताब्यात घेतले. नाशिक पोलिस या आरोपीला ठाणे पोलिसांच्या स्वाधीन करणार आहेत.

Read More