Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

तंबाखू खाणाऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

World No Tobacco Day Special Report : तंबाखूचा कुठलाही प्रकार आरोग्यास धोकादायक आहे. एक गंभीर आजारांना तंबाखूजन्य पदार्थांमुळे आमंत्रण मिळत आहे.  

 तंबाखू खाणाऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

अमर काणे / नागपूर :  World No Tobacco Day Special Report : तंबाखूचा कुठलाही प्रकार आरोग्यास धोकादायक आहे. एक गंभीर आजारांना तंबाखूजन्य पदार्थांमुळे आमंत्रण मिळत. तंबाखूजन्य धूम्रपानामुळे श्वसनरोग धोका जास्त वाढतो.नागपुरातील क्रीम्स हॉस्पिटलच्या एका अभ्यासामध्ये श्वसनरोगाच्या 20 टक्के रुग्णांना धूम्रपानाचे व्यसन असल्याचे पुढे आले आहे. 

धूम्रपान श्वसनरोगासाठी एक प्रमुख कारण असल्याचं या अभ्यासातून दिसून येत आहे. आज 31 मे जागतिक तंबाखू निषेध दिनाच्या निमित्ताने घेतलेला हा आढावा. तंबाखू व सिगरेटच्या आहारी जाऊन अनेकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

 नागपुरातील क्रीम्सरुग्णालयातील श्वसनरोग विभागाने गेल्या वर्षभरात 3 ,886 रुग्णांचा अभ्यास केला. रुग्णांमध्ये 51 टक्के पुरुष व 49 टक्के महिलांचा समावेश होता.जून 2021 ते मी 2022 उपचार आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांचा यात समावेश होता. वयोगटानुसार रुग्णांचे प्रमाण 

वय        टक्के 

41 ते 50    13 

51 ते 60    22 

61 ते 70    32 

71 ते 80    16 

या अभ्यासात श्वसनरोगानेग्रस्त 20 टक्के रुग्णांना धुम्रपानाचे व्यसन असल्याचा निष्कर्ष निघाला आहे.त्यामुळे धूम्रपान श्वसनरोगासाठी प्रमुख कारण असल्याचे दिसून येत असल्याचे सुप्रसिद्ध श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी सांगितले.याशिवाय धुम्रपान करणार्‍या या रुग्णांपैकी 27 टक्के रुग्णांना सीओपीडी विकार तर 23 टक्के रुग्णांना अस्थमा विकार होता. त्यामुळे या दोन विकारांसाठी ट्रिगर म्हणून धूम्रपान सेवन कारणीभूत असल्याचेही या अभ्यासातून पुढे आले आहे. याशिवाय 6 टक्के रुग्णांमध्ये कर्करोग झाल्याचेही आढळून आले आहे. 

हा आहे मोठा धोका

दीर्घकाळापर्यंत धुम्रपान केल्याने फुफ्फुसाच्या आत असलेल्या श्वास वाहिन्यांवर सुज आल्याने त्यांचा व्यास कमी होतो. त्यात स्त्राव वाढतो व त्यामुळे त्या वाहिन्या आकुंचन पावतात, तेव्हा दमाचा विकार होऊ शकतो. जर फुफ्फुसातील अ‍ॅल्विओलाय जे रक्तात ऑक्सिजन सोडण्याचे व कार्बनडाय ऑक्साईड शोषूण घेण्याचे कार्य करते; धुम्रपानामुळे अ‍ॅल्विओलायचा घेर वाढतो; त्यामुळे फुफ्फुसाची लवचिकता कमी होऊन ते कायमच प्रसरण पावण्याची प्रक्रिया सुरु होते. आणि ते क्षतीग्रस्त होतात. मग शरीराला पुरेसा प्राणवायु मिळत नाही आणि कार्बनडायऑक्साईडजे योग्य पद्धतीने उत्सर्जन होत नाही; अशा वेळी सीओपीडी विकाराची लागण झाल्याच पुढे येत.

याशिवाय चघळण्याच्या स्वरुपातील तंबाखूजन्य पदार्थ जसे मळलेला तंबाखू, खर्रा, गुटखा यामुळे मुखकर्करोग होऊ शकतो. सोबतच दीर्घकाळ धुम्रपानामुळे रक्तवाहिन्या आकुंचित पावून हृदयविकार होतात. कमी वयात हृदयविकार होण्यासाठी धुम्रपान कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे. रक्तदाब विकारांसाठीही धुम्रपान कारणीभूत असून याशिवाय सगळ्याच प्रकारच्या कर्करोगांसाठी ट्रिगर म्हणून तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन कारणीभूत असते.

Read More