Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांचा चांगला उपक्रम

वटपौर्णिमेच्या निमित्ताने एक चांगली बातमी. 

वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांचा चांगला उपक्रम

नवी मुंबई : वटपौर्णिमेच्या निमित्ताने एक चांगली बातमी. वडाची फांदी तोडून पूजा करण्यापेक्षा नवी मुंबई महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी एक चांगला उपक्रम हाती घेतला. तो म्हणजे वडाचे रोप लावण्याचा. महापालिका कर्मचारी महिलांनी महापालिकेच्या आवारात वडाची, आंब्याची आणि चाफ्याची रोपे लावून अनोखी वटपौर्णिमा साजरी केली. 

वटपौर्णिमेला झाडांच्या फांद्या तोडल्या जातात.महिला घरोघरी  वडाच्या झाडांच्या फांदीची पूजा करतात. हे करण्याऐवजी एक झाड लावावे हा संदेश नवी मुंबई महापालिकाच्या महिला कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने दिला आहे. यासाठी महिलांनी महापालिकेच्या आवारात वडाची, आंब्याची आणि चाफ्याचे वृक्षारोपण केले आणि अनोखी वटपौर्णिमा साजरी केली आहे. 

Read More