Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पुणे येथे पुन्हा रानगवा वस्तीत दाखल

पुणे शहरात पुन्हा एकदा रानगवा (Wild Animal Gava) वस्तीत आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

पुणे येथे पुन्हा रानगवा वस्तीत दाखल

पुणे : शहरात पुन्हा एकदा रानगवा (Wild Animal Gava) वस्तीत आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  पुण्यात (Pune) पुन्हा गवा (Gava) दिसल्याने भीती व्यक्त होत आहे. हा गवा पाषण तलावाजवळ  फिरताना दिसून आला आहे. दरम्यान, नागरिकांना महामार्ग आणि बावधन परीसरात गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. याआधी कोथरुड भागात गवा आला होता. त्याला पकडण्यात यश आले. मात्र, काही तासातच त्याचा मृत्यू झाला होता.

रानगवा पुणे शहरात घुसला आणि...

दरम्यान, याआधी आलेल्या गव्यामुळे अनेकांची पळापळ झाली होती. कोथरुड परिरात गव्यामुळे भीतीचे वातापरण होत. तसेच गव्याला बघण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी केली होती. वाट चुकलेला रानगवा (Gava) महात्मा सोसायटीच्या परिसरात सुरुवातीला दिसला होता. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. यावेळी बावधन परिसरात आलेल्या गवा पाहण्यासाठी कोणीही गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मागील अनुभव लक्षात घेता वनविभागाचे अधिकारी सतर्क झाले आहेत. या दुसऱ्या गव्याला  पकडण्यासाठी वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचत आहेत. कोणीही गर्दी करु नये. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Read More