Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

काही रेल्वे स्टेशनच्या नावासोबत 'रोड' का जोडलं जातं? यामागे आहे मोठं कारण

Indian Railway: भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे आशियातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. रेल्वे स्थानकाच्या नावाचा इतिहास तुम्हाला माहितीये का, जाणून घ्या   

 काही रेल्वे स्टेशनच्या नावासोबत 'रोड' का जोडलं जातं? यामागे आहे मोठं कारण

Trending News In Marathi: रेल्वे स्थानकांच्या मागे जंक्शन, टर्मिनल किंवा रोड असे शब्द लिहलेले असतात. पण तुम्हाला माहितीये का या शब्दांचा अर्थ काय. रेल्वे कोणत्याही शहराच्या स्थानकाच्या मागे असे शब्द का लिहित असेल. याचा तुम्ही कधी विचार केलाय का? तसंच, अनेक प्रवाशांना स्थानकाच्या मागे लिहलं असलेल्या रोड या शब्दाचा अर्थदेखील ठावूक नसतो. खरंतर रोड या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडला आहे. (Why some railway stations are named as road)

स्थानकाच्या मागे लिहलेल्या रोड हा शब्द प्रवाशांना दर्शवतो की स्थानकापासून शहर खूप आत वसलेले आहे. हे अंतर साधारणपणे 2 किलोमीटर ते 100 किलोमीटरपर्यंत असू शकते. म्हणून तुम्ही वसई रोड, डहाणू रोड या सारख्या स्थानकांवर उतरलात तर मुळं गाव त्या स्थानकांपासून थोडे लांब असते. स्थानकावर उतरुन त्या ठिकाणी जाण्यासाठी वाहने किंवा रस्तेमार्गे चालत जावे लागते. रेल्वे तुम्हाला स्थानकापासून काही अंतरावर उतरवेल. 

कोरा या प्लॅटफॉर्मवर एकाने याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना भारतीय रेल्वेत कार्यरत असलेल्या मुख्य प्रशासनिक अधिकारी अनिमेष कुमार सिन्हा यांनी त्याचा अर्थ सांगितला आहे. रेल्वे स्थानकामागे असलेले रोड हा शब्द हे सूचित करतो की त्या स्थानावर जाण्यासाठी रेल्वे स्थानकापासून एर रस्ता जातो आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे प्रवासी त्या रस्त्यावर उतरु शकतात. 

रोड नाव असलेल्या स्थानकापासून त्या शहराचे अंतर 2-3 किलोमीटरपासून ते 100 किलोमीटरपर्यंत असू शकते. जसं की वसई रोड रेल्वे स्थानक वसई गाव 2 किलोमीटर अंतरावर आहे. तसंच, महाराष्ट्राबाहेर असलेले कोडाईकनाल रोड रेल्वे स्थानक कोडाईकनाल शहरापासून 79 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, हल्ली स्थानकांच्या आजूबाजूच्या परिसरात खूप लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळं हा अर्थ हल्ली तंतोतत लागू होत नाही. पण जेव्हा ही रेल्वे स्थानक बांधण्यात आली तेव्हा इथे आजूबाजूला फार विकास झाला नव्हता. मात्र आता काळानुसार शहर बदलत चालली आहेत. गावातही शहरीकरण वेगाने होत आहे. प्रवाशांना रेल्वेचा प्रवास सोपा व्हावा म्हणून रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूचा परिसर झपाट्याने बदलतो आहे. 

Read More