Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

देवदर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात; भाविक शिर्डी, पंढरपूर, कोल्हापुरात दाखल तर मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात रात्रीपासूनच रांगा

Welcome New Year 2023 : नव्या वर्षाचा पहिला दिवस अनेकांनी देवदर्शनाने केला आहे. देवदर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक शिर्डी, पंढरपूर, कोल्हापुरात दाखल झाले आहेत. येथे मोठी गर्दी दिसून येत आहे. 2023 या नव्या वर्षात मोठ्या आशा आकांक्षा घेऊन जगाने प्रवेश केला आहे.  

देवदर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात; भाविक शिर्डी, पंढरपूर, कोल्हापुरात दाखल तर मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात रात्रीपासूनच रांगा

Welcome New Year 2023 : नव्या वर्षाचा पहिला दिवस अनेकांनी देवदर्शनाने केला आहे. देवदर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक शिर्डी, पंढरपूर, कोल्हापुरात दाखल झाले आहेत. येथे मोठी गर्दी दिसून येत आहे. 2023 या नव्या वर्षात मोठ्या आशा आकांक्षा घेऊन जगाने प्रवेश केला आहे. हे नवं वर्ष आरोग्यदायी, आर्थिकदृष्ट्या भरभराटीचं आणि सर्व अपेक्षा पूर्ण करणारं जावो ही प्रार्थना करण्यासाठी सर्वसामान्य भाविक पहिल्याच दिवशी मंदिरात मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात रात्रीपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. तर शिर्डीतही साईंची उपासना करण्यासाठी हजारो भाविक आले आहेत. 

शिर्डी, पंढरपूर, कोल्हापुरात भाविकांची तुफान गर्दी

शिर्डी, पंढरपूर, कोल्हापुरात भाविकांची तुफान गर्दी केली आहे. देवदर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले आहेत. नवीन वर्ष प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने साजरा करत असतो. कोणी पार्टी करतं तर कुणी फॅमिलीसह ट्रीपला जातं तर भक्तगण मंडळी आपापल्या श्रद्धास्थानी दाखल होत असतात. पंढरपूर असो शिर्डी असो वा शेगाव असो याठिकाणी हजारोंच्या संख्येने भाविक माथा टिकवण्यासाठी येत असतात. बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथेही भक्तगण दर्शनासाठी दाखल झाले आहेत. नववर्ष निमित्तानं नांदेड जिल्ह्यातील माहूरमधल्या रेणुकामातेच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी माहूर मध्ये भाविकांची गर्दी झालीय. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी माहूर एक पूर्ण शक्तिपीठ आहे. 

 नागपुरात नववर्षाची सुरुवात साईच्या दर्शनाने झाली आहे. तर वर्धा मार्गावरील साई मंदिरात पहाटेपासूनच भक्तांची रिघ दिसून येत आहे.नववर्षाच्या पहिल्या दिवशी हजारो भक्त साईच्या दर्शनाला दाखल झालेत. साई मंदिराचा संपूर्ण परिसरात फुलांची ,सजावट करण्यात आली आहे.

 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पानेफुल आणि फळांने सजावट 

नववर्षा निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुंदर अशा पाना फुलांचे आणि फळांच्या सजावटीने सजलंय. आळंदी मधील भाविक प्रदीप ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबाने ही सजावट केलीय. चौखांबी, सोळखांबी या ठिकाणी डाळिंब संत्रे सफरचंद अननस ही फळे आणि झेंडू, जरबेरा, गुलाब, कार्नेशन ही फुले वापरून सजावट केलीय. नवीन वर्षानिमित्त पहिल्या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी पंढरपूरमध्ये गर्दी केली आहे. 

मुंबईच्या वॉटर किंगडममध्ये थर्टी फर्स्टची धम्माल 

वर्ष 2023चं मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मुंबईच्या वॉटर किंगडममध्ये थर्टी फर्स्टची धम्माल पार्टी रंगली.. यामध्ये डीजे प्रवीणच्या तालावर मुंबईकर बेभान होऊन थिरकले. नवी उमेद आणि नवी स्वप्नं घेऊन नवे वर्ष 2023 सुरू झालं आहे. त्याचं स्वागत उत्साहात करण्यात आलं.  

Read More