Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Weather Maharashtra : उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, पुढील आठवड्यात तापमानात वाढ

Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना विदर्भातील काही भागात पाऊस आणि उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे. 

Weather Maharashtra : उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, पुढील आठवड्यात तापमानात वाढ

महाराष्ट्राच्या हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आगे.  पुढील 24 तासात राज्यासह देशाच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 31 मार्चपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे पावसाची शक्यता हे असं वातावरण पुढील काही दिवस राहिलं असं सांगण्या येत आहे.  

कमाल तापमान चाळिशी पार गेल्यास व तापमानात सरासरीच्या तुलनेत 4.5 अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते. ही लाट महाराष्ट्रात अनुभवायला मिळत आहे. सध्या उन्हाची झळ चांगलीच लागत असल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात वाढलेलं तापमान अनुभवायला येत आहे. अकोला येथे देशातील सर्वाधिक 42.6 अंशाची नोंद झाली.

राज्यातील काही भागात पावसाची अंदाज आहे. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, हिंगोली, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. तसेच यवतमाळ, अमरावती, अकोला जिल्ह्यात उष्णता अनुभवायला मिळणार आहे. 

देशाच्या काही भागात पाऊस पडत असताना दुसरीकडे देशाच्या काही भागात तापमानात वाढ झाली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तसेच मुंबईसह पुण्यात तापमानात वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानात वाढ पाहता येईल. एवढंच नव्हे तर पुढील दोन महिने म्हणजे एप्रिल आणि मे महिना अतिशय उन्हाचा असणार आहे. 

31 मार्चपर्यंत पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि भारताच्या वायव्य लगतच्या मैदानी भागात पाऊस आणि काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये यासारख्या ठिकाणी हलका पाऊस आणि बर्फवृष्टी झाली. उत्तर-पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये हिमवृष्टीसह पाऊस पडला आहे. 

Read More