Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मुंबई-ठाण्यासह या भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

पुढचे दोन दिवस तुमच्या जिल्ह्यात कसं असणार हवामान पाहा काय आहे हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज   

मुंबई-ठाण्यासह या भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : राज्यात अवकाळी पावसाचं संकट आणि वाढणारी थंडी बदललेल्या वातावरणामुळे अनेक नागरिकांना त्रास होत आहे. तर अवकाळी पावसामुळे बळीराजावर संकट ओढवलं आहे. काल संध्याकाळी मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ पाहायला मिळाली. 

राज्यातील काही ठिकाणी आजही हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. आंबा आणि काजू बागायतदारांसाठी ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे संकट ओढवलं आहे. 

दुसरीकडे हवामान विभागाने पुन्हा एकदा अवकाळी पवासाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसाच विदर्भात हवामान कोरड राहील अशी शक्यता व्यक्त केली आहे.

पुढील १२ तासांत उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे (तास 20-30 किमी) येण्याची शक्यता आहे. मुंबई ठाणे पालघर आणी आसपासच्या भागांत असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 

Read More