Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

महाराष्ट्रातील या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा

शेतकरी आणि बागायतदारांसाठी मोठी बातमी, पुढचे 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा, पाहा तुमच्या जिल्ह्यात काय हवामानाचे अपडेट्स  

महाराष्ट्रातील या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई : राज्यातील शेतकरी आणि बागायतदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अवकाळी पावसाचं संकट जाण्याचं काही नाव घेत नाही. एकीकडे कमालीची उष्णता वाढत आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं संकट ओढवलं आहे. 

मागच्या दोन दिवसांत कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट आणि वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसानं शेतकरी आणि बागायतदारांचं अतोनात नुकसान झालं आहे. काढणीला आलेली द्राक्ष आणि आंब्याचं मोठं नुकसान झाल्यानं बागायदार हवालदील झाले आहेत. 

आता हवामान विभागानं पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील ५ दिवसांत केरळ,माहेमध्ये हलका पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात कोकण गोवा,मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

दुसरीकडे उष्णता कमालीची वाढत असून 38 डिग्रीपर्यंत तापमान वाढण्याची शक्यता आहे. आताच एवढं तापमान वाढत असेल तर एप्रिल आणि मे महिन्यात उष्णता जास्त असू शकते यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. 

Read More