Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Crime News : घरातून काढला सोन्याचा हंडा...पोलिस तपासात उघड झाले धक्कादायक वास्तव

Crime News :  इंदिराने सहा हजार रुपये उसने घेऊन त्या व्यक्तीला दिले. दोघांनीही पैसे घेतले आणि तेथून निघून गेले. 11 मार्च रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास दोघेही पुन्हा महिलेच्या घरी आले आणि घरातील पोर्च जवळ खड्डा करुन जमिनीतून हांडा काढला. हांड्यात मूर्ती आणि सोन्याचे दगडं होते.

Crime News : घरातून काढला सोन्याचा हंडा...पोलिस तपासात उघड झाले धक्कादायक वास्तव

Wardha Crime News :  वर्धा येथून एका व्यक्तीच्या घरातून सोन्याने भरलेला हंडा काढण्यात आला. मात्र, पोलिस तपासात यामागचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. आर्वी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे (Wardha Crime News). 

तुमच्या घरात सोन्याचा हांडा आहे, तो काढण्यासाठी पैसे लागतील. सोन्याचा हिरा देखील आहे, असे आमिष दाखवून 50 हजार रुपये उकळण्या आले आहेत. महिलेने सोन्याच्या हांड्याची पाहणी केली असता त्यातून सोन्याचे पॉलिश केलेले दगडं निघाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने परिसरातील नागरिकांच्या मदतीने दोन्ही भामट्यांना पकडून ठेवत पोलिसांच्या स्वाधीन केले. 

पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. आसाराम नंदू वाघ, रोशन पिसाराम गुजर (रा. परसोळी ता. कळमेश्वर जि. नागपूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर, या प्रकरमातील दोन आरोपी फरार असल्याची माहिती आर्वी पोलिसांनी दिली. आर्वी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाढोणा येथे हा प्रकार घडला.  इंदिरा गुलाब राऊत असे फसणुक झालेल्या आरोपीचे नाव आहे.  9 मार्च रोजी हातात मोरपीस असलेला झाडू घेऊन दोन व्यक्ती या महिलेकडे आले होते. त्यातील एकाने दहा रुपये मागितले. इंदिराने दहा रुपये दिले असता एकाने डोक्यावर झाडू मारुन तुमच्या घरात सोन्याचा हांडा आहे तो काढण्यासाठी सहा हजार रुपये लागतील असे सांगितले. 

इंदिराने सहा हजार रुपये उसने घेऊन त्या व्यक्तीला दिले. दोघांनीही पैसे घेतले आणि तेथून निघून गेले. 11 मार्च रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास दोघेही पुन्हा महिलेच्या घरी आले आणि घरातील पोर्च जवळ खड्डा करुन जमिनीतून हांडा काढला. हांड्यात मूर्ती आणि सोन्याचे दगडं होते.

दोघांनी पुन्हा महिलेकडून 13 हजार रुपये घेतले. त्यानंतर दोघांनी तुमच्या घरात यापेक्षाही एक मोठा हिरा आहे. तो नंतर काढून देतो असे म्हणत पैसे घेऊन दोघेही निघून गेले. दुसऱ्या दिवशी फोन करुन माझ्या मित्राला 21 हजार रुपये देऊन त्याच्याकडून औषध घेऊन या असे भामट्याने सांगितले. महिलेच्या मुलाने सकाळच्या सुमारास बसस्थानकावर जात 21 हजार रुपये देत औषध घेत घरी आणले. दोन्ही आरोपी पुन्हा घरी आले मुलाने औषध त्यांना दिले त्यांनी ते औषध हांडा काढला त्या खड्ड्यात टाकले आणि या खड्ड्यात मोठा हिरा आहे असे म्हणत तो खड्डा बुजवून 10 हजार रुपये घेतले. 

12 मार्च रोजी महिलेच्या मुलाने भामट्याला फोन केला असता हिरा काढण्यासाठी 9 लाख 10 हजार रुपये द्यावे लागेल असे सांगितले. अखेर महिलेने पैसे देणं होत नसल्याचे सांगितले. महिलेला संशय आल्याने तिने हांडा उघडून पाहिला असता त्यात सोन्याचे पॉलिश केलेले दगडं आणि मूर्ती होती. अखेर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. 

 

Read More