Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवले, आरोपी पसार

हिंगणघाटमध्ये एका शिक्षिकेला पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार 

एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवले, आरोपी पसार

वर्धा : वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटमध्ये एका शिक्षिकेला पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आज सकाळी साडे सात वाजता ओरोपी विकेश नगराळे यानं या शिक्षिकेला पेटवून दिलं. आरोपी हा घटनास्थळाहून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असून त्यातूनच तिला जाळण्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

यात ही ३० वर्षीय शिक्षिका २० ते ३० टक्के भाजली आहे. त्यामुळे महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला उपजिल्हा रुग्णालयातून नागपूरकडे रवाना करण्यात आले आहे.

आरोपी विकेश हा शिक्षिकेच्या गावातलाच असल्याची माहिती पुढं आली आहे.

जखमी शिक्षिकेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Read More