Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मुन्ना यादव कुठे लपलाय? विधानसभेत विखेंचा गौप्यस्फोट!

नागपूर पोलिसांना हवा असलेला हत्येच्या प्रयत्नातला आरोपी मुन्ना यादव कुठे लपलाय? याचा गौप्यस्फोट करत विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील एकच खळबळ उडवून दिली.

मुन्ना यादव कुठे लपलाय? विधानसभेत विखेंचा गौप्यस्फोट!

नागपूर : नागपूर पोलिसांना हवा असलेला हत्येच्या प्रयत्नातला आरोपी मुन्ना यादव कुठे लपलाय? याचा गौप्यस्फोट करत विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील एकच खळबळ उडवून दिली.

नागपूरपासून २२ किलोमीटर अंतरावर एका फार्महाऊसवर दडून बसलाय, असा गौप्यस्फोट विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सभागृहात केलाय.  

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावात राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय. 

मुन्ना यादवचा नागपूर पोलीस रात्रं-दिवस शोध घेतायत. तो सापडत नसल्याचं सांगितलं जातंय.  

Read More