Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

बारामतीमध्ये अजित पवारांना गोपीचंद पडळकरांचं आव्हान

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ७७ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

बारामतीमध्ये अजित पवारांना गोपीचंद पडळकरांचं आव्हान

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ७७ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि आदिती तटकरे या दिग्गजांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं होम ग्राऊंड असलेल्या बारामतीमध्ये अजित पवार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

काहीच दिवसांपूर्वी अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर अजित पवार तब्बल २२ तास नॉट रिचेबल होते. यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली. तसंच शरद पवारांनी सांगितलं तर आपण बारामतीची जागा लढू, असंही स्पष्ट केलं होतं.

तर बारामतीमधून भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीमध्ये होते. गोपीचंद पडळकर यांनी लोकसभेची निवडणूक सांगली मतदारसंघातून लढली होती.

भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीमध्ये गोपीचंद पडळकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत एकूण १४ उमेदवारांची आहे. पहिल्या यादीत भाजपने १२५ जणांना उमेदवारी दिली होती. म्हणजेच भाजपने १६४ जागांपैकी आतापर्यंत १३९ जणांच्या नावाची घोषणा केली आहे. पण यामध्ये एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यांचा अजूनही समावेश करण्यात आलेला नाही.

 

Read More