Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध

 मंत्री असलेले जानकर यांनी भाजप ऐवजी राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर परिषदसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे उत्सुकता निर्माण झाली होती.

विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध

नागपूर : विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता ११ जागांसाठी केवळ ११ उमेदवारच मैदानात असतील. त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होईल असं संसंदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलंय. पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज दाखल केल्यामुळे ११ जागांसाठी उमेदवारांची संख्या १२ झाली होती. त्यामुळे निवडणूक होणार हे स्पष्ट होते. त्यातच पक्षांकडे असलेला मतांचा कोटा पाहता निवडणूक चुरशीची झाली असती. मात्र, देशमुख यांनी अर्ज मागे घेतला आणि ही चुरस टळली.

मंत्री जानकरांचा मार्ग मोकळा

विधानपरिषदच्या निवडणुकीसाठी आजचा (सोमवार, ९ जुलै ) दिवस हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवस होता. त्यामुळे अखेरच्या दिवशी देशमुख यांनी आपला अर्ज मागे घेतला. भाजपाच्या या निर्णयामुळे महादेव जानकर यांना दिलासा मिळणार आहे. कॅबिनेट मंत्री असलेले जानकर यांनी भाजप ऐवजी राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर परिषदसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे उत्सुकता निर्माण झाली होती.

..तर निवडणूक अटळ होती

दरम्यान, आकरा जागा असताना त्यापेक्षा एकही अर्ज वाढीव राहिला आणि अर्जांची संख्या १२ किंवा त्यापेक्षा अधिक राहिली तर, निवडणूक अटळ होती.

Read More