Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर दक्षिण-पश्चिममधून विजय

नागपूर दक्षिण-पश्चिम या मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय झाला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर दक्षिण-पश्चिममधून विजय

नागपूर : नागपूर दक्षिण-पश्चिम या मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय झाला आहे. जवळपास २५ हजारांच्या मताधिक्याने फडणवीस यांनी बाजी मारली आहे. देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेसच्या आशिष देशमुख यांचं आव्हान होतं. एकीकडे मुख्यमंत्र्यांचा विजय झाला असला, तरी त्यांच्या मंत्रिमंडळातल्या काही दिग्गजांना पराभवाचा धक्का लागला आहे. पंकजा मुंडे, राम शिंदे या बड्या मंत्र्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

निकाल महाराष्ट्राचा : महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील हे आहेत विजयी उमेदवार

दुसरीकडे महाराष्ट्रातल्या सगळ्या २८८ जागांचे कल आता स्पष्ट होऊ लागले आहेत. यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष असणार आहे. पण जागांच्याबाबतीत भाजप पहिल्या क्रमांकावर, शिवसेना दुसऱ्या, राष्ट्रवादी तिसऱ्या आणि काँग्रेस चौथ्या क्रमांकावर राहील, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. 

LIVE निकाल महाराष्ट्राचा : मुंबई

LIVE निकाल महाराष्ट्राचा : कोकण

LIVE निकाल महाराष्ट्राचा : मराठवाडा 

LIVE निकाल महाराष्ट्राचा : विदर्भ

LIVE निकाल महाराष्ट्राचा : पश्चिम महाराष्ट्र

Read More