Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Viral Video : कंडक्टर आणि महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी, घटना कॅमेऱ्यात कैद

Women Fighting Video : बस स्थानकावर महिला कंडक्टर आणि महिला प्रवाशाने कुस्तीचा आखाडाच बनवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Viral Video : कंडक्टर आणि महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी, घटना कॅमेऱ्यात कैद

Latur Viral Video : सोशल मीडियावर महिलांच्या हाणामारीचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये सीटवरुन महिलांमधील राड्याचे असंख्य व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकुळ घालत असतात. यातील काही व्हिडीओ तर ट्रेंडिंगमध्येही असतात. महिलांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून वादा वादी आणि भांडण होतं असतात. या भांडण्याचं रुपांतर नंतर हाणामारीत होतं. कधी लोकल ट्रेनमध्ये तर कधी बसमध्ये तर कधी शाळेत...ठिकाण वेगवेगळे असले तरी या घटनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. (video women fighting conductor and passenger women beating each other video viral Latur news Trending video )

नुकताच महिला वाहक आणि महिला प्रवाशाने बस स्थानकालाच कुस्तीचा आखाडा बनवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. महिलांमधील ही हाणामारी बस स्थानकावर उपस्थित एका प्रवाशाने काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

तुम्ही पाहू शकता या महिला एकमेकांना मारताना दिसत आहे. किरकोळ वादातून ही हाणामारी सुरु झाली. या व्हिडीओमध्ये महिलांची हाणमारीला थांबविण्यासाठी अखेर इतर प्रवाशांना पुढाकार घ्यावा लागला. मारामारीचं नेमकं कारण काय झालं ते कळू शकलेले नाही. मात्र हा व्हिडीओ लातूर बस स्थानकातील असल्याचं बोलं जातं आहे. 

खिचडीवरुन दोघींचा शाळेतच राडा 

दुसरीकडे बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील महिलांचा शाळेतील राडा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. शालेय पोषण आहार खिचडी दर्जेदार नसल्याचा जाब महिला शिक्षिकेने विचारताच तिचा पारा चढला. खिचडी शिजवणाऱ्या महिलेने आरोपाचं खंडन करत महिला शिक्षेकेला मारहाण करण्यास सुरुवात केली. (women fighting in school)

अक्षरशः एकमेकींचे केस ओढत त्यांनी शाळेच्या पवित्र जागेला आपल्या कृत्याने धक्का पोहोचवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शनिवारी खिचडी शिजवणाऱ्या महिलेस आहाराबद्दल विचारल्यावर तिला राग आला आणि तिने महिला शिक्षिकेशी हुज्जत घातली. 

Read More