Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

ऐकावं ते नवलच! तव्यावरील डोसानंतर आता आलाय चुलीवरचा बाबा, पाहा VIDEO

Video Viral :  अनेकदा भोंदूबाबाच्या प्रतापाचे किस्से एकले असतील. याचा बळी द्या आणि समस्या दूर करा.., भक्त गोळा करण्यासाठी हे बाबा वेगवेळ स्टंटसुद्धा करत असतात. असाच एक बाबा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ऐकावं ते नवलच! तव्यावरील डोसानंतर आता आलाय चुलीवरचा बाबा, पाहा VIDEO

Viral Video on Baba sit on the stove :  अनेकजण अजूनही काही समस्या घेऊन भोंदूबाबाकडे जात असतात. अशावेळी भोंदूबाबा पण भक्त गोळाकरण्यासाठी अनोखे स्टंटबाजी करत असतात. काही भोंदूबाबा कधी जळत्या विस्तवावर चालतील तर कधी जळता कापूर गिळतील. अशा अनेक बाबांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तुम्ही आतापर्यंत तव्यावरील चपाती किंवा डोसा पाहिला असेल, मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा बाबा चक्क लांबलचक चुलीवर बसलेला दिसून येत आहे. या यामध्ये हा बाबा चक्क गरम तव्यावर बसून भक्तांना आशीर्वाद देत असल्याचं दिसत आहे. 

गरम तव्यावर बसून भोंदूबाबा भक्तांना आशीर्वाद आणि शिव्या...

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मार्डी येथील एका भोंदूबाबा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये हा बाबा चक्क गरम तव्यावर बसून भक्तांना आशीर्वाद देत असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओमध्ये संत सच्चिदानंद गुरुदास महाराज (Saint Satchidananda Gurudas Maharaj video viral) म्हणून स्वत:ला महाराज समजणारा भोंदूबाबा तव्यावर बसून भक्तांना आशीर्वादच देत नाहीये तर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुद्धा करत आहे.

दैवी शक्ती प्राप्त होत असल्याचा दावा या बाबाने केला. दैवी शक्ती दरम्यान मला भान राहत नसून मी अंधश्रद्धा पसरवत नसल्याचे या भोंदूबाबाचा दावा आहे. त्यामुळे अंनिसने या बाबाला चॅलेंज दिलंय. महाराजांचा हा चमत्कार खरा असेल तर त्यांनी तो आमच्यासमोर सिद्ध करावा. आम्ही तीस लाखांचं बक्षीस देऊ नाहीतर महाराजाला अटक करावी अशी मागणी अंनिसने केली आहे.

वाचा : तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे का? नवीन दर जाणून घ्या 

महाराजांना अटक करण्याची मागणी 

या संपूर्ण प्रकारविषयी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या भोंदू बाबाला खुले आव्हान दिले असून महाराजांचा हा चमत्कार खरा असेल तर त्यांनी तो आमच्या समोर सिद्ध करावा आम्ही तीस लाखाचा त्यांना बक्षीस देऊ नाहीतर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे व महाराजांना अटक करावी अशी मागणी अनिस वतीने केले करण्यात आली आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ अमरावतीचा असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी हा व्हिडीओ फक्त मनोरंजनापुरा मर्यादित ठेवला तप काही नेटकऱ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणाविरोधी कायदा कुठे आहे असा सवाल उपस्थित केला आहे. 

Read More