Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

VIDEO : स्टेशन मास्तरच्या छोट्या चुकीमुळे दोन हमाल लोकलखाली चिरडले

'मृतदेह घेऊन जाणाऱ्या हमालांच्या पाठिमागून जात असलेले स्टेशन मास्टर मनोज चव्हाण यांनी गाडीची वेळीच सूचना दिली असती तर हा अनर्थ टळला असता'

VIDEO : स्टेशन मास्तरच्या छोट्या चुकीमुळे दोन हमाल लोकलखाली चिरडले

वसई : वसईमध्ये स्टेशन मास्टरच्या चुकीमुळे दोन हमालांना आपला जीव गमवावा लागलाय... वसई स्थानकाजवळ पंकीराज नायडू हे रुळावर पडल्यामुळे जखमी झाले होते. त्यांना आणण्यासाठी स्टेशन मास्टर, डॉक्टर, पोलीस आणि चार हमाल गेले होते. मृतदेह घेऊन परत येत असताना पाठिमागून आलेल्या विरार लोकलनं दोन हमालांना चिरडलं. रामविलास पासवान आणी हरिराम राजभर अशी या दोन हमालांची नावं आहेत.

दोन हमाल आणि पोलिसांनी वेळीच रुळावरून बाजुला उडी मारल्यामुळे ते बचावले... मृतदेह घेऊन जाणाऱ्या हमालांच्या पाठिमागून जात असलेले स्टेशन मास्टर मनोज चव्हाण यांनी गाडीची वेळीच सूचना दिली असती तर हा अनर्थ टळला असता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीय.

या अपघातात स्वतः स्टेशन मास्टरही जखमी झाले असून त्यांच्यावर वसईच्या गोल्डन पार्क रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Read More