Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

तुम्ही देखील तुमच्या घरात असं पाणी वाचवू शकता

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या रावेतमध्ये महिलांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

तुम्ही देखील तुमच्या घरात असं पाणी वाचवू शकता

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या रावेतमध्ये महिलांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ही आहे पिंपरी चिंचवडच्या रावेत भागातली सलेस्टीयल सोसायटी. तब्बल 700 सदनिका या वसाहतीत आहे. इथल्या महिलांनी पाणीबचतीसाठी प्रयत्न सुरू केलेत. या वसाहतीत प्रती मिनिट 12 लीटर या दबावाने पाणी येतं. ब्रश करताना, दाढी करताना किंवा भांडी घासताना हे पाणी वाया जातं. त्यामुळे आता पाण्याचं प्रेशर कमी करण्यासाठी नळामध्ये इरेटर बसवण्यात आला आहे. त्यामुळे आता नळाला प्रतीमिनिट 3 लीटर पाणी येतं आहे. म्हणजेच 10 मिनिटांत संपूर्ण वसाहतीत तब्बल 80 हजार लीटर पाण्याची बचत होते.

पाणी हेच जीवन, पाणी वाचवा

विशेष म्हणजे हे इरेटर सर्वांनी स्वखर्चाने बसवले आहेत. ते ही घरातल्या नळाला. शहरी भागातले नागरिक पाणीटंचाईकडे संवेदनशीलपणे पाहात नाहीत, ही ओरड सातत्याने केली जाते. त्याला दिलेलं हे जोरदार उत्तर आहे. पण हा प्रयोग केवळ एका वसाहतीसाठी मर्यादीत न राहता सर्वांनी याबाबत पुढाकार घेणं गरजेचं आहे. 

Read More