Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

Unseasonal rain | राज्यावर अवकाळीचं संकट; या जिल्ह्यांना जबरदस्त फटका

Unseasonal rain |  राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला.. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय..

Unseasonal rain | राज्यावर अवकाळीचं संकट; या जिल्ह्यांना जबरदस्त फटका

मुंबई : राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला.. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय.. तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये वादळी वा-यासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. औरंगाबादमध्येही मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल तसंच काही भागात गारपीटही होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

अवकाळी पावसाने शेतकरी संकटात अडकला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रात्रीच्या सुमारास निफाड आणि येवला परिसरात वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडला. जवळपास अर्धातास पडलेल्या पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला...पण, पिकांना मोठा फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा, गहू आणि द्राक्ष पिकांना फटका बसला आहे.

पुण्यातही काही ठिकाणी अवकाळी पावसाने बळीराजाच्या चिंतेत भर घातली. उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना रात्री वादळी वा-यासह अवकाळी पावसाने झोडपलं. अचानक पडलेल्या या तुफान पावसाने शेतक-यांची चिंता पुन्हा वाढली आहे.

काढणीला आलेल्या गहू, कांदा, हरभरा यासारख्या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतक-यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. 

Read More