Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

सनातनच्या दोघांना एसटीएसने तासगावमधून घेतले ताब्यात

 सनातनच्या दोन साधकांना तासगाव तालुक्यातून एटीएस पथकाने ताब्यात घेतले आहे.

सनातनच्या दोघांना एसटीएसने तासगावमधून घेतले ताब्यात

सांगली : सनातनच्या दोन साधकांना तासगाव तालुक्यातून एटीएस पथकाने ताब्यात घेतले आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, ही कारवाई अत्यंत गुप्त पद्धतीने केली. दरम्यान, कोणत्या चौकशीसाठी आणि कोणाला ताब्यात घेतले, याबाबत अधिकृत माहिती एटीएसने जाहीर केलेली नाही. तपासात एकदम गोपीनियता बाळगण्यात आली आहे. दरम्यान, एक जण तासगाव ग्रामीण तर एक जण तासगाव शहरातील असल्याची माहिती मिळत आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर एटीएसनं योग्य कारवाई केली असती, तर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश याची हत्या झालीच नसती, असा खळबळजनक दावा खटल्यातील प्रमुख साक्षीदाराने केलाय. कोल्हापुराच्या संजय साडवीलकरांनी झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत हा दावा केलाय. 

साडविलकारांनी दाभोलकरांच्या हत्येआधीच साताऱ्याजवळ एका ढाब्यावर एटीएसच्या अधिकाऱ्याला सनातनच्या हालचालींची सगळी माहिती दिल्याचा दावाही केलाय. झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत अधिकाऱ्याचं नाव सांगण्यात मात्र साडविलकर असमर्थ ठरलेत.

Read More