Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

धक्कादायक, आईकडूनच दोन चिमुकल्यांची गळा दाबून हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न

 Satara murder : सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईनेच पोटच्या गोळ्यांचा गळा घोटला आहे. 

धक्कादायक, आईकडूनच दोन चिमुकल्यांची गळा दाबून हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न

सातारा : Satara murder : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईनेच पोटच्या गोळ्यांचा गळा घोटला आहे. आईने दोन चिमुकल्यांचा गळा दाबून खून केल्याची घटना कराड रुक्मिणीनगरमध्ये घडली आहे. (Two children strangled to death by mother in Satara)

6 आणि  8 वर्षांच्या दोन्ही मुलांचा गळा दाबल्यानंतर आईनेही विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या कराडच्या रुग्ण्यालयात आईवर उपचार सुरु आहेत. काही महिन्यांपूर्वी पतीचा मृत्यू झाल्याने आईने हे कृत्य केल्याची माहितीएका चिठ्ठीतून समोर आली आहे. 

पतीचे गेल्या सहा महिन्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला. दोन्ही मुलांच्या आईला तिच्या पतीच्या  मृत्यूचा विरह सहन होत नसल्याने आम्ही हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या दुहेरी खुनाच्या घटनेमुळे कराड शहर आणि परिसर हादरला आहे.  

 स्वतःच्या सहा आणि आठ वर्षाच्या दोन मुलांचा गळा दाबून आईनेच खून केल्याचा प्रकार समोर आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यानंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

 

Read More