Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

इंदुरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही तृप्ती देसाई म्हणतात...

 इंदोरीकरांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी तृप्ती देसाई पुण्यातून रवाना झाल्या आहेत. 

इंदुरीकर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही तृप्ती देसाई म्हणतात...

अहमदनगर :  हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी सम-विषम वादावर दिलगिरी व्यक्त केल्याने गेले काही दिवस सुरु असलेला वाद आता संपुष्टात आला आहे. पण असे असले तरी तृप्ती देसाई या आपल्या भुमिकेवर ठाम आहेत. इंदोरीकर महाराज महिलांवर जे भाष्य करतात ते आक्षेपार्ह आहे असा आरोप देसाईंनी केलाय. इंदोरीकरांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी तृप्ती देसाई पुण्यातून रवाना झाल्या आहेत. थोड्याच वेळात त्या अहमदनगरला पोहोचत आहेत. 

कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला उद्देश नव्हता पण भावना दुखावल्या असल्यास आपण मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असं इंदुरीकर महाराज यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्टीकरण देत, दिलगिरी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे इंदुरीकर महाराजांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई अहमदनगर इथं पोलीस अधीक्षकांची भेट घेणारेत. 

इंदोरीकरांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी तृप्ती देसाई पुण्यातून रवाना झाल्या आहेत. थोड्याच वेळात त्या अहमदनगरला पोहोचत आहेत. तृप्ती देसाई यांच्या या मागणीला नगरमधून विरोध होत आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयासह शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

याआधी इंदुरीकर महाराजांनी पत्र लिहुन आपल्या समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. 

Read More