Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

नागपुरात रिक्षा चालकांकडून वाहतूक पोलिसांना जबर मारहाण, दोघांना अटक

 रिक्षा चालकांनी दोन वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

नागपुरात रिक्षा चालकांकडून वाहतूक पोलिसांना जबर मारहाण, दोघांना अटक

नागपूर : गणेशपेठ बसस्थानकासमोर रिक्षा चालकांनी दोन वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. रिक्षा चालकांनी वाहतूक पोलिसांना माराहाण केल्याच्या  घटनेचा व्हिडिओ 'झी मीडिया'ला मिळाला आहे. प्रकाश सोनवणे आणि किशोर धपके असे जखमी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी मयूर राजूरकर आणि सोनू कांबळे या दोघा रिक्षा चालकांना अटक केली आहे.

गणेशपेठ बसस्थानकासमोर प्रचंड वाहतूक असते. तसेच परिसरात अनेक वाहने नियमबाह्य पार्क केलेली असतात. त्यामुळे चेंबर तीनचे वाहतूक पोलीस कर्मचारी किशोर धपके आणि प्रकाश सोनवणे यांनी नियमबाह्य पार्क केलेल्या गाड्यांवर कारवाई करत जामर लावले. ही कारवाई सुरु असताना वाहतूक कर्मचाऱ्यांशी रिक्षा चालक मयूर राजूरकर आणि सोनू कांबळे यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. 

या वादातूनच त्यांनी वाहतूक पोलीस कर्मचारी प्रकाश सोनावणे आणि किशोर धपके यांना जबर मारहाण केली. त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याची वर्दीही फाडली. या रिक्षा चालकांनी धपके यांना जोरदार मारहाण केली. दरम्यान या घटनेनंतर गणेशपेठ पोलिसांना दोन आरोपी रिक्षा चालकांना अटक केली आहे. दरम्यान, यापूर्वीही गणेशपेठ परिसरात वाहतूक पोलिसांना मारहाणीच्या घटना घडली आहे. तर मंगळवारी एका वाहनचालक युवकाने  पोलिसावर हल्ला करण्याची घटना संविधान चौकात घडली होती.

Read More