Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

रिक्षात साडी अडकल्याने प्रवासी महिला गेली फरफटत; कोल्हापुरातील थरारक घटना

भरधाव वेगात असलेल्या रिक्षासह महिला फरफटत जात आहे. हे दृष्य पाहून नागरिक भयभित झाले. कोल्हापुरात विचित्र अपघात घडला आहे. 

रिक्षात साडी अडकल्याने प्रवासी महिला गेली फरफटत; कोल्हापुरातील थरारक घटना

Kolhapur Accident  News : रिक्षात साडी अडकल्याने प्रवासी महिला फरफटत गेली आहे. कोल्हापुरात ही थरारक घटना घडला आहे. या विचित्र अपघातामुळे एकच गोंधळ उडाला आहे. या महिलेला रिक्षासोबत फरफटत जात असल्याचे पाहून स्थानिकांनी आरडा ओरडा करुन रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिक्षाचालक भरधाव वेगात होता. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

हा अपघात नेमका कसा झाला?

कोल्हापुरातील राजारामपुरी येथे हा विचित्र अपघात घडला आहे. रिक्षात साडी अडकल्याने प्रवासी महिला दूरपर्यंत फरफटत गेली.  ही घटना घडण्यापूर्वी रिक्षाचालक आणि महिलेमध्ये भाड्यावरून वाद झाला होता अशी माहिती समोर येत आहे. वाद मिटल्यानंतर रिक्षाचालक निघून जात असताना ही घटना घडली. रिक्षाचालकाल महिला फरफटत येत असल्याची कल्पना नसल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. या महिलेची साडी रिक्षामध्ये कशी अडकली हे अद्याप समजू शकलेले नाही. 

थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

हा सर्व थरार  CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. CCTV फुटेजमध्ये भरधाव वेगात असलेल्या रिक्षासह महिला फरफटत जात असल्याचे दिसत आहे. हे दृष्य पाहून स्थानिक आरडा ओरडा करुन रिक्षा चालकाला रिक्षा थांबवण्यास सांगत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. काही अंतरावर गेल्यावर रिक्षा चालकाने रिक्षा थांबवली. या घटनेत महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पुण्यात ST बसला अपघात 

पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या भुतोंडे खोऱ्यातील करंदी गावाच्या हद्दीत ST बस चारित पलटी झाल्यानं अपघात झाला आहे. ST बस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या साईड पट्टीवर असताना त्यावरील माती खचल्यानं हा अपघात झाला. यावेळी बस मध्ये शालेय विध्यार्थ्यांसह 40 प्रवासी होते. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही. बस मातीत हळुवार खचत गेल्यानं मोठा अनर्थ टळला. भोर तालुक्याच्या भुतोंडे खो-यातील भोर -मळे एसटी बसला वाढाणे गावच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. 

Read More