Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे तीन बळी, झाड कोसळून दुर्घटना

बुलडाणा जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली. वादळाने झाड कोसळून आईसह दोन चिमुरडयांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे तीन बळी, झाड कोसळून दुर्घटना

बुलडाणा : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पाऊस आला. बुलडाणा जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली. खामगावमध्ये संध्याकाळी सलग दोन तास पाऊस झाला. यावेळी विजेच्या कडकडाटासह वारा सुरू होता. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळ्याने त्याचा फटका गावाला बसला. वादळी पावसामुळे निंबाचे झाड घरावर कोसळले. यात आईसह दोन चिमुरडयांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. खामगावमधील घाटपुरी येथे ही घटना घडली.

खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील आनंदनगर येथे निबांचे झाड घरावर पडल्याने आईसह दोन चिमुरडयाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची  घटना घडली. शारदा गुणवंत हिरडकर (२८), सुष्टी गुणवंत हिरडकर (३), ऋषिकेश गुणवंत हिरडकर (२) यांचा समावेश यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. क्रेनच्या सहायाने निंबाचे झाड बाजुला करण्यात आले.  

काल संध्याकाळच्या दरम्यान तालुक्यातील घाटपुरी येथील हॉटेल व्यवसायिक गुणवंत हिरडकर यांच्या घराशेजारी जुने निंबाचे झाड होते. वादळ आणि पावसाने निंबाचे झाड घरावर कोसळले. यावेळी घरात असलेली त्यांची पत्नी शारदा, मुलगी सुष्टी आणि मुलगा ऋषिकेश हे घरात असल्याने ते झाडाखाली दबले. 

या दुर्घटनेची माहिती मिळाताच अनेकांनी घराकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. घराचा सांगाडा आणि कोसळलेले झाड याच्या खाली गुणवंत हिरडकर यांचे कुटुंब दबले गेले. पोलिसांनी आणि नागरिकांनी घटनास्थळी घाव घेत घरावर पडलेले झाड क्रेनच्या साहायाने बाजुला केले. झाडाखाली दबलेले आई, मुलगी-मुलाला बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गुणवंत हिरडकर हे हॉटेल व्यवसायीक असल्याने ते कामावर होते. त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

जिल्ह्यात सर्वदूर मान्सून

मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर बुलडाणा जिल्ह्यात सर्वदूर मान्सूनच्या सरी बरसल्याने बळीराजासह जिल्ह्यातील नागरिक सुखावल्याचे दिसून येत आहे. बहुतांश ठिकाणी नद्यानाल्यांना पूर आलेत. यंदा उशिराने जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्याने पेरणीची कामे लांबली होती मात्र आज संध्याकाळी चांगला पाऊस झाल्याने बळीराजाची चिंता दूर झाल्याचं चित्र दिसत आहे.  

Read More