Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

देहू येथील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत स्थितीत आढळल्याने खळबळ

देहू गावातील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत पावले आहेत. नदीतील जलपर्णी काढण्याचं काम सुरू असताना मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळून आले. नदीतील देवमासा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाशीर प्रजातीचे हे मासे आहेत. नदीतील प्रदूषणामुळे या माशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

देहू येथील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत स्थितीत आढळल्याने खळबळ

पुणे : देहू गावातील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत पावले आहेत. नदीतील जलपर्णी काढण्याचं काम सुरू असताना मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळून आले. नदीतील देवमासा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाशीर प्रजातीचे हे मासे आहेत. नदीतील प्रदूषणामुळे या माशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

प्रदूषण नियंत्रण मंडळ तसंच संबंधित यंत्रणेमार्फत त्याबाबतचा शोध घेण्यात येत आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत सुमारे १५ हजार मृत मासे नदीतून काढण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ तसंच व्यक्त होत आहे.

सकाळी सातपासून शकडो लोकं हे मासे नदीतून बाहेर काढण्याच्या कामात लागले होते. काही दिवसांवर आषाढी वारी येऊन ठेपली आहे. वारकरी या दिवशी इंद्रायणी नदीत स्नान करतात. पण त्याआधी अशा प्रकारची घटना समोर आल्याने वारकरी ही संताप व्यक्त करत आहेत. नदीत सांडपाणी आणि रासायनिक पाणी सोडले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.

Read More