Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

कल्याण क्राइम: आईचा झोपेतच मृत्यू, लेकाला कळलंच नाही, 2 दिवस तिच्याशेजारीच बसून राहिला, अन्...

Kalyan Crime News: कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आईच्या मृत्यूनंतर 14 वर्षांचा मुलगा तिच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला होता. 

कल्याण क्राइम: आईचा झोपेतच मृत्यू, लेकाला कळलंच नाही, 2 दिवस तिच्याशेजारीच बसून राहिला, अन्...

Kalyan Crime News: कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील एका इमारती मध्ये राहणाऱ्या 44 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे 14 वर्षांच्या मुलाला त्याच्या आईचा मृत्यू झाला याची कल्पनाच नव्हती. हा चिमुरडा मुलगा सलग दोन दिवस आईच्या मृतदेहाशेजारीच बसून होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, मुलांच्या या अवस्थेवरही अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी आल्याने त्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी याबाबत खडकपाडा पोलिसांना माहिती दिली आणि ही हृदय हेलावून टाकणारी घटना उघड झाली आहे. 

सेल्विया डेनीयल ही महिला पती डेंनीयल आणि 14 वर्षाचा मुलगा मुलगा ऑलविन सोबत कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा येथील सुंदर कॉम्प्लेक्स मध्ये राहत होती. सेल्विया यांचे पती कामानिमित्त काही दिवसांपूर्वी बाहेर गेले होते. सेल्विया आणि मुलगा ऑलवीन हे घरात होते. घरात झोपी गेलेल्या सेल्विया यांचा झोपेतच मृत्यू झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

दोन दिवसानंतर घरातून दुर्गंधी येत होती. त्यानंतर शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी याबाबत खडकपाडा पोलिसांनी माहिती दिली. शेजारी राहणाऱ्यांनी व पोलिसांनी दार ठोठावले मात्र आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळं पोलिसांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला. पोलिसांनी आत प्रवेश करताच त्यांना धक्काच बसला. घरात एक महिला मृतावस्थेत पडून होती. तिच्या शेजारी एक मुलगा बसला होता. 

महिला सेल्वीया ही झोपेतच मृत्यूमुखी पडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र तिच्या शेजारी तिचा मुलगा ऑलविन दोन दिवसापासून बसून होता. त्याला आईचा मृत्यू झाला हे कळलेच नाही. पोलिसांनी मुलाची प्राथमिक विचारपूस केली असता त्याची मनस्थिती ठिक नसल्याचे लक्षात आले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनाकरीता महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविला आहे. मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे ? याचे कारण समोर येणार आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, मुलासाठी हळहळदेखील व्यक्त करण्यात येत आहे. 

Read More