Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

राज्यात १८० तालुक्यांत भीषण दुष्काळाची स्थिती

राज्यातल्या सुमारे १८० तालुक्यांत भीषण दुष्काळाची स्थिती आहे. 

राज्यात १८० तालुक्यांत भीषण दुष्काळाची स्थिती

औरंगाबाद : राज्यातल्या सुमारे १८० तालुक्यांत भीषण दुष्काळाची स्थिती आहे. राज्यसरकारने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली. मंत्र्यांचे दौरे होणार हे लक्षात आल्यावर यंत्रणाही कामाला लागली. दुष्काळी कामं सुरू झाली. चार दिवस कामही झालं. पालकमंत्री आले पाहणी केली आणि लागलीच दुसऱ्या दिवशी काम बंद झाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त फुलंब्री तालुक्यातील धानोरा या गावात दुष्काळामुळे गावात शेतात कुणालाही काम नाही. त्यामुळं ग्रामपंचायतने रोजगार हमी योजने अंतर्गत कामाची मागणी पंचायत समितीकडे केली. 

काम मंजूर झालं आणि उदघाटन झालं, कामाला सुरुवात झाली. चार दिवसांनी पालकमंत्री दीपक सावंत यांनी पाहणी केली आणि कौतुकही केलं. त्यानंतर दोन दिवसांनी कुठलीही सूचना न देता काम बंद करण्यात आलं. आता काम का बंद केलं हे गावकऱ्यांना सुद्धा माहिती नाहीय.

Read More