Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

संगणक हॅक करून सोडवला रेल्वे भरतीचा पेपर, चार जणांना अटक

संगणक हॅक करून रेल्वे भरतीचा ऑनलाईन पेपर सोडविण्याचा प्रकार उघड.

संगणक हॅक करून सोडवला रेल्वे भरतीचा पेपर, चार जणांना अटक

ठाणे : संगणक हॅक करून रेल्वे भरतीचा ऑनलाईन पेपर सोडविण्याचा प्रकार एका मुन्नाभाईने केला. ठाण्यात रेल्वे भरतीत ऑनलाईन पेपर सोडवणाऱ्या मुन्नाभाईला अटक करण्यात आली आहे. रेल्वे भरती बोर्डाचा ऑनलाईन पेपर संगणक हॅक करून लिहल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. 

रेल्वेच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी ही परीक्षा घेतली जात होती. ठाण्यातल्या कासारवडवली भागातल्या एका खासगी केंद्रावर ही परीक्षा घेतली जात होती. ज्या संगणकावर विद्यार्थी पेपर सोडवत होते. त्या संगणाकाचा ऑनलाईन एक्सेस स्पायडर रिमोट डिव्हाईसच्या मदतीने परराज्यातील आरोपीला देण्यात आला होता. हा आरोपी परराज्यात बसून ठाण्यातील केंद्रावरचा पेपर सोडवत होता. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. तर चौथा आरोपी फरार आहे.

 

Read More