Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

ठाणे-गिरीजा हाईटस इमारतीच्या आगीतून ५ जण वाचले

 रंगासाठी इमारतीला बांधलेल्या बांबूंवरून चढून जाऊन त्यांनी चौघांचे जीव वाचवले.    

ठाणे-गिरीजा हाईटस इमारतीच्या आगीतून ५ जण वाचले

ठाणे : ठाण्यातील हरिनिवास सर्कल परिसरातील गिरीराज हाईट्स इमारतीला मोठी आग लागली होती.  इमारतीच्या 26 व्या मजल्याला लागलेली ही आग वरून खालच्या बाजूला पसरली होती. मात्र अग्निशमन दलाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग विझवली. 

आगीचं कारण अस्पष्ट

आगीचं कारण अजून समजलेलं नाही. दरम्यान नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय धुमाळ यांनी या धुमसत्या आगीतून 4 जणांचे प्राण वाचवले. रंगासाठी इमारतीला बांधलेल्या बांबूंवरून चढून जाऊन त्यांनी चौघांचे जीव वाचवले.    

आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्यात. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

Read More