Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

TET Exam Scam : पैशांसाठी शिक्षकच बनला एजंट, तिघांना अटक

TET Exam Scam : शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात नाशिक आणि पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. शिक्षक पात्रता  परीक्षा प्रकरणात आणखी तिघांना अटक करण्यात आले आहे.  

TET Exam Scam : पैशांसाठी शिक्षकच बनला एजंट, तिघांना अटक

पुणे : TET Exam Scam : शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात नाशिक आणि पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. शिक्षक पात्रता  परीक्षा प्रकरणात आणखी तिघांना अटक करण्यात आले आहे. उमेदवारांकडून पैसे घेऊन अधिकाऱ्यांना पुरवल्याचं उघड झाले आहे. यात एक सब एजंटचा समावेश आहे. हा एजंट दुसरा कोणी नाही तर एक शिक्षक आहे. मुकुंद सूर्यवंशी, असे या अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तर वरिष्ठ लिपिक राजेंद्र साळुंके आणि दीपक भुसारी यालाही अटक केली. (TET Exam Scam: Agent becomes teacher for money, three arrested)

शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी  शिक्षक मुकुंद सूर्यवंशी याला पुणे सायबर पोलिसांनी नाशिकमधून अटक केली आहे. या घोटाळ्यात दलालांनी अपात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेत. परीक्षा पात्रता गैरव्यवहारात केलेल्या स्वप्नील पाटील यांच्याकडे चौकशी केली असता माहिती समोर आली. त्यानंतर नाशिक येथून राजेंद्र सोळुंकेला अटक केली गेली. त्याला  23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. 2019 - 20 च्या परीक्षेतील यादी त्याने दिली होती. तर मुकुंद सूर्यवंशी याला शुक्रवारी अटक केली होती. 

शिक्षक भरती घोटाळ्यात आणखी दोन दलाल अटकेत आहे. नाशिक सायबर गुन्हे शाखेने बुलडाण्यात कारवाई केली. 7,800 अपात्र उमेदवारांकडून पैसे घेतल्याचं उघड झाले आहे. या आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश.  

या घोटाळ्यात दलालांनी अपात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेत. यात राज्यातील सात हजार 800 अपात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. आता या प्रकरणी आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

Read More