Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

'वाल्या कोळ्याच्या पापाचा भागीदार...' सुषमा अंधारेनी राजीनाम्यावरुन फडणवीसांना डिवचले

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरही राजकारण्यांमधील कलगीतुरा सुरुच आहे. यावेळी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट लिहत वाल्या कोळीची गोष्ट सांगितली आहे.

'वाल्या कोळ्याच्या पापाचा भागीदार...' सुषमा अंधारेनी राजीनाम्यावरुन फडणवीसांना डिवचले

Sushma Andhare On Devendra Fadanvis: लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरही राजकारण्यांमधील कलगीतुरा सुरुच आहे. यावेळी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट लिहत वाल्या कोळीची गोष्ट सांगितली आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. याआधी शिवसेनेत फूट पडली आणि शिवसेना शिंदे गट भाजपसोबत गेला. यानंतर राष्ट्रवादीचा गट फूटून राष्ट्रवादी अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत गेला. यानंतर एका मुलखतीत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा आलो पण येताना 2 पक्ष फोडून आलो, असे विधान केले. यामुळे त्यांना जनतेचा रोष सहन करावा लागला. महाराष्ट्रात महायुतीला 40 पेक्षा जास्त जागा मिळण्याची अपेक्षा होती. या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली. 

दरम्यान सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टवरुन फडणवीसांवर निशाणा साधलाय. फडणवीसांवर टीका करताना त्यांनी वाल्या कोळीची गोष्ट सांगितली. ही गोष्ट सांगताना फडणवीसांच्या सोबतीला आता काही अपवाद वगळता पक्षातूनच कोणी नाहीय. कठीण समय येता कोण कामास येतो? असा प्रश्न त्यांनी विचारला.

सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट 

देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या भाजपाचा पराभव स्वीकारण्याचा मानभावीपणा दाखवत राजीनाम्याची भाषा करून एक दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र देवेंद्रजी या सगळ्या प्रकरणात एकटे पडल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या.मोहित कंबोज आणि केशव उपाध्य वगळता त्यांच्या समर्थनार्थ कोणीच आले नसल्याचेही त्या म्हणाल्या. देवेंद्रजींच्या जीवावर ज्यांनी चिक्कार लाभाची पदे आणि कोट्यावधीची प्रॉपर्टी जमा केली. काहींनी मुंबईत 15- 15 , 
20-20 कोटीचे डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केले. त्यातला एकही त्यांच्या समर्थनार्थ कालपासून बोलताना दिसत नसल्याचे त्या म्हणाल्या. कठीण समय येता कोण कामास येतो? असा प्रश्न त्यांनी विचारत देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याकडे लक्ष वेधले. यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Read More