Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

इंदूरीकर महाराजांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू - माजी मंत्री सुरेश धस

माजी मंत्री सुरेश धस यांचा इशारा...

इंदूरीकर महाराजांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू - माजी मंत्री सुरेश धस

बीड : इंदूरीकर महाराजांवर कारवाई केली तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू, असा इशारा माजी मंत्री सुरेश धस यांनी दिलाय. महाराज जे बोलले ते गुरु चरित्रात आहे. मग त्यात गैर काय असा सवाल करत धस यांनी निवृत्ती महाराज यांचे समर्थन केले आहे. कुणी काहीतरी बोलले म्हणून महाराजांना नोटीस पाठवले असेल तर राज्य सरकारच्या अकलीची किव येते, अशी टीकाही धस यांनी केली आहे.

इंदुरीकर महाराजांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. तर काही जण त्यांच्या समर्थनात देखील पुढे येत आहेत. इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात संगमनेर येथे वैद्यकीय विभागाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. प्रसुतीपूर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्यानुसार त्यांनी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

दरम्यान या सगळ्या वादामुळे उद्विग्न झालेल्या इंदुरीकर महाराजांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कीर्तन सोडून आता शेती करेन, असं त्यांनी म्हटलं आहे. 

'समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी ही भागवतातही खरंय, ज्ञानेश्वरीतही खरंय. मी म्हणतोय हे खरं आहे. तरी लोकं म्हणताय याला ठेऊन द्या. तीन दिवसात अर्धा किलोने कमी झालो हो. आपली आता कपॅसिटी संपली. उद्या-परवाचा दिवस बघायचा, ठेऊन द्यायचा फेटा, आता शेतीच करायची. आता नको. असं देखील इंदुरीकर महाराजांनी म्हटलं आहे.

'यूट्यूबवाले काड्या करतात. कॅमेरावाले मागे लागलेत. यूट्यूब चॅनेलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु सांगतो चॅनल संपतील पण मी नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

Read More