Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

नागपुरात वृद्ध दाम्पत्याची विष प्राशन करून आत्महत्या

आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली.

नागपुरात वृद्ध दाम्पत्याची विष प्राशन करून आत्महत्या

नागपूर : नागपुरात एका वृध्द दाम्पत्यांने विष प्राशन करून आत्महत्या केली. ओमसाई नगरमध्ये ही घटना घडली. ७० वर्षाचे बुधराम कटरे, आणि ६५ वर्षांच्या त्यांच्या पत्नी रामीबाई कटरे यांनी शनिवारी विष प्राशन करत आत्महत्या केली. सुरुवातीला दोघांचे वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याचं वाटलं होतं. मात्र, रुग्णालयात उत्तरीय तपासणीत दोघांनी विष घेतल्याचं स्पष्ट झाले. पोलिसांनी घरी केलेल्या तपासात आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात गरिबी आणि वृद्धापकाळी ऐकटे राहत असल्यानं आत्महत्या करत असल्याचं कारण नमूद करण्यात आलं आहे.

Read More