Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची केंद्राला 'ही' शिफारस

Sugarcane Farmer News : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. आता ऊस कारखान्यांची मक्तेदारी मोडीत निघण्याची शक्यता.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची केंद्राला 'ही' शिफारस

मुंबई : Sugarcane Farmer News : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कुठल्याही कारखान्याला ऊस देण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने केंद्र सरकारला शिफारस केली आहे. त्यामुळे आता यापुढे दोन साखर कारखान्यांमधील अंतराचं बंधनही काढून टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखान्यांची मक्तेदारी मोडीत निघणार आहे.

साखर कारखान्यांचा कारभार समाधानकारक नसतानाही संबंधित कारखान्यांना ऊस देण्याचं बंधन आता उठण्याच्या मार्गावर आहे. (Maharashtra Sugarcane Farmer) केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने केंद्र सरकारला हे बंधन उठविण्याची शिफारस केली आहे. त्यामध्ये दोन साखर कारखान्यांमधील अंतराचं बंधनही काढून टाका, असं स्पष्ट केले आहे. ऊस उत्पादकांना चांगला दर मिळावा यासाठी कृषी मूल्य आयोगाच्या पातळीवर या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read More