Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

धक्कादायक! कॉपी करताना पकडलं, विद्यार्थ्याने घेतला टोकाचा निर्णय

कृषी पदवीका अभ्यासक्रमाच्या परीक्षेदरम्यान धक्कादायक घटना

धक्कादायक! कॉपी करताना पकडलं, विद्यार्थ्याने घेतला टोकाचा निर्णय

उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेपर सोडवताना कॉपी करत असलेल्या विद्यार्थ्याला शिक्षकाने पकडलं. त्यामुळे तणावात आलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

कृषी पदवीका अभ्यासक्रमाची परीक्षा सुरु असून समुद्रवाणी इथं राहणारा 21 वर्षांचा स्वप्निल ढोबळे हा विद्यार्थी ही परीक्षा देत होता. परीक्षेदरम्यान स्वप्निल कॉपी करत असल्याचं परीक्षा विभागाच्या पथकाला आढळलं. पथकाने त्याला रंगेहाथ पकडलं. या कारणासाठी त्याला 1 वर्ष निलंबित करण्यात आलं.

कारवाई झाल्याने स्वप्निल प्रचंड तणावात होता. यातूनच त्याने आत्महत्या करण्याच निर्णय घेतला. स्वत:च्या शेतात जाऊन त्याने कडूलिंबाच्या झाडाल गळफास घेत जीवन संपवलं. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Read More