Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

बारामतीमध्ये 5 ते 11 मे पर्यंत कडक लॉकडाऊनचा निर्णय

लॉकडाऊनमधे मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहेत.

बारामतीमध्ये 5 ते 11 मे पर्यंत कडक लॉकडाऊनचा निर्णय

बारामती : बारामतीतील प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बारामतीत 5 मे पासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमधे मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. दूध विक्रीसाठी सकाळी 7 ते 9 पर्यंत मुभा देण्यात आली आहे. 

बारामतीमध्ये  हा 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन बारामतीकरांनी पाळणं गरजेचं आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बारामती प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 5 ते 11 मे दरम्यान नागरिकांना बाहेर पडता येणार नाहीये. किराणा, भाजी मंडई देखील बंद राहणार आहे.

राज्यात एकीकडे दररोज रुग्णांची मोठ वाढ होत असल्याने रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होत नाहीयेत. कोरोनाचा हा संसर्ग रोखण्यासाठी अजूनही तरी लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याने लॉकडाऊन लागू करावा लागत आहे.

Read More