Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

सरकारकडून शिक्षणाचा बाजार, अजित पवारांची जळजळीत टीका

राज्य सरकार संस्थाचालकांना दरोडेखोर तर शिक्षकाला चोर समजून वागवणूक देतंय, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगावात सरकारवर केलीय. 

सरकारकडून शिक्षणाचा बाजार, अजित पवारांची जळजळीत टीका

जळगाव : राज्य सरकार संस्थाचालकांना दरोडेखोर तर शिक्षकाला चोर समजून वागवणूक देतंय, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगावात सरकारवर केलीय. 

 शिक्षण व्यवस्था कोलमडेल

एखाददुसरा चुकला तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार सरकारकडे आहेत. परंतु सरकार शिक्षण व्यवस्था कोलमडायला निघालंय. राज्यात एकीकडं चौदाशे शाळा बंद करून गोरगरिबांच्या शिक्षणाची गैरसोय सरकार करायला निघालंय तर दुसरीकडं कार्पोरेट कंपन्यांमार्फत शाळा उघडण्याचा विचार सरकार करतंय. 

कार्पोरेट शाळा

भांडवलदारांच्या संस्थांमध्ये सर्वसामान्य मुलांना शिक्षण मिळत नव्हतं म्हणून पंजाबराव देशमुख. कर्मवीर भाऊराव पाटील, वसंतदादा पाटील यांनी शाळा उघडल्या. परंतु राज्य सरकार लाखो रुपये शैक्षणिक शुल्क वसूल करणाऱ्या कार्पोरेट शाळा उघडून राज्यातील सर्वसामान्य मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम करतंय, अशीही टीका अजित पवार यांनी यावेळी केलीय. 

Read More