Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

एसटी भरतीत दुष्काळी भागातील तरुणांना संधी, कधी-कुठे कराल अर्ज...

औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे आणि सोलापूर या १२ जिल्ह्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध

एसटी भरतीत दुष्काळी भागातील तरुणांना संधी, कधी-कुठे कराल अर्ज...

मुंबई : दुष्काळी भागातील तरूणांना एसटीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळणारेय. दुष्काळी भागासाठी एसटीची ४४१६ चालक तसंच वाहक पदाची जाहिरात प्रसिद्ध झालीय. औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे आणि सोलापूर या १२ जिल्ह्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया १८ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

मराठा, सवर्ण आरक्षण लागू होणार

महत्त्वाचं म्हणजे, १६ टक्के मराठा आरक्षण आणि केंद्र सरकारनं नुकतंच जाहीर केलेलं १० टक्के आर्थिक दुर्बल आरक्षण या जाहिरातीसाठी लागू असणार आहे. 

याआधी कोकण विभागात वेगवेगळ्या पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरतीचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला होता. असं असताना आता पुन्हा एकदा मेगा भरती शासनानं जाहीर केलीय. या संदर्भातील घोषणा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात आली होती. आज या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय.

fallbacks
एसटी महामंडळ भरती 

या भरतीसाठी पात्रता

- उमेदवार दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे

- उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा अधिकृत परवाना असणं आवश्यक आहे

- अवजड वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव गरजेचा

- उमेदवाराकडे आरटीओचा चालक आणि वाहकाचा बिल्ला असणं गरजेचं आहे

कुठे कराल अर्ज...

उमेदवारांना msrtc.gov.in आणि msrtcexam.in या अधिकृत संकेत स्थळावर अर्ज करता येणार आहे.  

Read More