Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

जेव्हा नववधूचीही वरात निघते ...

लग्नाच्या वरातीत नवरदेव घोड्यावर बसलेला आपण नेहमी पाहतो पण नांदेड मध्ये मात्र नवरदेवाच्या बरोबरीनेच नववधूची देखील घोड्यावरुन वरात काढण्यात आली. 

जेव्हा नववधूचीही वरात निघते ...

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड  : लग्नाच्या वरातीत नवरदेव घोड्यावर बसलेला आपण नेहमी पाहतो पण नांदेड मध्ये मात्र नवरदेवाच्या बरोबरीनेच नववधूची देखील घोड्यावरुन वरात काढण्यात आली. नांदेडच्या हडको येथील रहिवासी सोपानराव पाटील सोमुरकर यांनी आपल्या मुलासह सुनेला देखील घोड्यावर बसवून वेगळ्या पद्धतीने नववधूचे स्वागत केले... मुलींना देखील समान हक्क असल्याचे आपण बोलतो... पण प्रत्यक्षात तशी कृती मात्र होत नाही. आपल्या परिवारात देखील मुलींना समान हक्क आहेत... त्यामुळे सुनेला देखील मुलासारखं घोड्यावर बसवुन वरात काढल्याचे सोपानराव पाटील यांनी सांगितले.

तेलंगणा येथील अनुषा हिचा विवाह सुबोध सोबत झाला. आपल्या सासुरवाडीत अश्या पद्धतीने स्वागत होईल याची नववधूला कल्पना देखील नव्हती... पण नवरदेवाला आपल्या वडिलांचा निर्णय आवडला... त्यामुळे त्याने लगेच या वेगळ्या वराती साठी होकार दिला... 

 सोमुरकर पाटील परिवाराने लग्न देखील साध्या पद्धतीने केले... स्त्रीलाही सारखाच सन्मानाचा संदेश देणा-या या लग्नसोहळ्याची आणि वरातीची नांदेड मध्ये चर्चा सुरु आहे...

Read More