Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

नातीच्या वयाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून...' 2 वृद्धांकडून संताप आणणारा प्रकार

Solapur Crime:  सोलापूरमधून एक चीड आणणारा प्रकार समोर आलाय. 

नातीच्या वयाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून...' 2 वृद्धांकडून संताप आणणारा प्रकार

Solapur Crime: कोलकाता मेडीकल कॉलेजमध्ये ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या घटनेतून भारत अद्यापही सावरला नाहीय. बदलापूर अल्पवयीन मुलींचे शोषण प्रकरणानंतर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील संतापही कमी झालेला नाही.अशा नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जातेय. यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात येतंय.  असे असताना राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक संतापजनक प्रकार समोर येत आहेत. सोलापूरमधून असाच एक चीड आणणारा प्रकार समोर आलाय. 

दोन्ही आरोपी 60 च्या पार 

चॉकलेटचे आमिष दाखवून 2 वृद्धांकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आलाय. बार्शी तालुक्यातील वैरागमध्ये हा प्रकार समोर आलाय. 2 वृद्धांकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरण समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे यातील दोन्ही आरोपी साठीच्या पार आहेत. एका आरोपीचे वय साठ वर्षे आहे तर दुसऱ्या आरोपीचे वय 80 वर्षे आहे.यांनी अवघ्या अकरा वर्षाच्या मुलीचा विनयभंग केला. इतक्या म्हातार वयात आपल्या नातीच्या वयाच्या मुलीसोबत असा प्रकार करताना त्यांच्या मनात काहीच दयामायेचा विचार आला नसेल का? असा प्रश्न विचारला जातोय. 

चॉकलेटचे आमिष दाखवून विनयभंग

निळू बळीराम माने या 60 वर्षीय आणि आगतराव मुळे या 80 वर्षीय वृद्धांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या वृद्धांनी पीडित मुलीला चॉकलेट आणि पैशाचे अमिष दाखवले. यानंतर त्यांनी अकरा वर्षाच्या शाळकरी मुलीचा विनयभंग केला. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी हा प्रकार घडला होता. 

पोलिसांत गुन्हा दाखल 

पिडीतेच्या आईला सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या पायाखालची वाळूच सरकली. तिने हा प्रकरा घरच्यांच्या निदर्शनास आणून दिला. यानंतर दोन्ही वृद्धांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Read More